Friday, September 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वापर परवाना नसला तरी पात्र मिळकतींवर कर आकारणी

तरुण भारतbyतरुण भारत
September 24, 2026
in soalpur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : वापर परवाना उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे नवीन मिळकतींची मालमत्ता कर आकारणी प्रलंबित ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. त्यामुळे अपार्टमेंटमधील फ्लॅट तसेच गाळ्यांच्या कर आकारणीला गती मिळणार असून, बिल्डरने कर आकारणी करून घेतली नसलेल्या फ्लॅटधारकांना दिलासा मिळणार आहे.
         महापालिका हद्दीतील नवीन मिळकतींचा शोध घेऊन त्यांची मालमत्ता कर आकारणी करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यासाठी संबंधित कर निरीक्षक व वसुली लिपिकांशी चर्चा करून उद्दिष्ट व कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात असून, दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.नवीन मिळकतींच्या सर्वेक्षण व कर आकारणीच्या आढाव्यात काही प्रकरणांत वापर परवाना उपलब्ध नसल्याने तसेच अन्य कारणांमुळे कर आकारणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांच्या मिळकती कर आकारणीच्या कक्षेत आणण्यासाठी आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
         ज्या मिळकतीला बांधकाम परवाना मिळालेला आहे मात्र वापर परवाना घेतलेला नाही, अशा मिळकतीची मालमत्ता कर आकारणी करावी. बांधकाम परवाना मिळाल्यापासून आदेशात नमूद केलेल्या एक वर्षाच्या कालावधीचा विचार करून कर आकारणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
बिल्डरने कर आकारणी केली नसेल तर…
अपार्टमेंट इमारतीचा वापर परवाना नसल्यामुळे बिल्डरने फ्लॅटची मालमत्ता कर आकारणी करून घेतली नसेल, तर कर आकारणी प्रलंबित ठेवू नये. अशा प्रकरणात फ्लॅट खरेदी केल्याची तारीख किंवा संबंधित फ्लॅटचे लाईट बिल घेतल्याची तारीख, यापैकी लागू होणाऱ्या तारखेपासून मालमत्ता कर आकारणी करावी. तसेच संबंधित व्यक्तीची नोंद भोगवटादार म्हणून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे फ्लॅट वापरात असूनही केवळ वापर परवाना उपलब्ध नसल्यामुळे मालमत्ता कर आकारणी झालेली नसल्यास फ्लॅटधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या कर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
बिल्डरच्या नावावर आधीच कर आकारणी असल्यास
एखाद्या अपार्टमेंटमधील फ्लॅटची मालमत्ता कर आकारणी मूळ मालक अथवा बिल्डरच्या नावावर झालेली आहे मात्र इमारतीचा वापर परवाना उपलब्ध नाही, अशा प्रकरणातही केवळ या कारणामुळे कर आकारणीची नोंद प्रलंबित ठेवू नये.मिळकतधारकाकडून वापर परवाना अथवा अन्य कारणांमुळे कर आकारणी करून घेतली नसल्यास मूळ मालक अथवा बिल्डरचे नाव मालकी हक्काच्या नोंदीत कायम ठेवून प्रत्यक्ष वापर करणाऱ्या व्यक्तीचे नाव भोगवटादार म्हणून नोंदवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी काय करावे ?
फ्लॅट, गाळा किंवा नवीन मिळकत खरेदी करून वापर सुरू केलेल्या नागरिकांनी आपल्या मिळकतीची मालमत्ता कर नोंद झाली आहे की नाही, याची खात्री करावी. कर आकारणी झालेली नसल्यास संबंधित कर विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.यासाठी फ्लॅट खरेदीची तारीख, लाईट बिलाची तारीख, मालकी हक्काची कागदपत्रे तसेच उपलब्ध बांधकाम अथवा परवानगीशी संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत. नवीन मिळकतींची कर आकारणी ही महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, प्रत्येक नागरिकाच्या मालमत्तेची अधिकृत कर नोंद होण्यासाठीही आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मिळकतीची कर आकारणी व नोंदणी अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
Post Views: 15
Previous Post

दुष्काळ जाहिर करा, शहराला पाणीपुरवठा करा

Next Post

लोकसेवा विद्यालयाच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लोकसेवा विद्यालयाच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

लोकसेवा विद्यालयाच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

पारंपारिक लेझीम रिंग टिपऱ्या आणि झांजसह निघाली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मिरवणूक#solapur #yesnews

September 24, 2026

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253997

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!