बार्शी – लोकसेवा विद्यालय, आगळगावच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. विविध वजनी गटांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळेच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये आसफ मुजावर (६६ किलो), आर्यन लोंढे (६२ किलो), राजवीर लगड (३५ किलो), राजवीर माने (३८ किलो) आणि विराज लंगोटे (४८ किलो) या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांना वस्ताद अक्षय गिराम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री. नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी श्री. पाटील, जॉईंट सेक्रेटरी श्री. ए. पी. देबडवार, खजिनदार श्री. जयकुमार शितोळे, शालेय समिती अध्यक्ष श्री. डी. एम. मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. प्रवीण कदम, मुख्याध्यापक श्री. एस. पी. उकिरडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे लोकसेवा विद्यालय, आगळगावच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही हे कुस्तीपटू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.