सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी ॲड.व्ही.एस.गायकवाड, ॲड.संपतराव पाटील, प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख उपस्थित होते. यावेळी प्रस्तावनेत डॉ.रणजीत देशमुख यांनी आपल्या हक्कांची जाणीव असण्याबरोबरच इतरांच्या हक्कांचा आदर करणे आणि संविधानाने सांगितलेल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. ॲड.व्ही.एस.गायकवाड यांनी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संकल्पनांसोबतच न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्याधर पैलवान यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष बाबुरावभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
Post Views: 13