सोलापूर – निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. लवकरच शिवसैनिक तो दाखल करतील,अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिली.
शिवसेनेच्या प्रवक्त्या व सोलापूर जिल्हा संपर्क नेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कामकाजाविषयी टिप्पणी केली. निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व त्यांचे दोन सहकारी यांनी बनला आहे. निवडणुकी संदर्भातील कोणताही निर्णय घेताना या तिघांमधील दोघांचे बहुमत असेल तरच तो निर्णय घेण्याची तरतूद आहे. मात्र ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्या दोन सहकारी निवडणूक आयुक्तांच्या भिन्न मताला केराची टोपली दाखवत एकतर्फी निर्णय घेतला आहे हे त्यांचा पक्षपातीपणा आहे.
सुषमा अंधारे यांनी यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी जी एफ आय आर ची प्रत त्या व त्यांचे सहकारी शिवसैनिक पोलिसात देणार आहेत ती प्रतही दाखवली. तसेच ही यानुसार आम्ही पोलिसात गुन्हेही दाखल करणार आहोत असे सांगितले.
निवडणूक आयोगाच्या संहितेत तसेच 2023 साली केलेल्या सुधारणेमध्ये निवडणूक आयोगाचे निर्णय एकमताने घ्यावेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र त्या तरतुदीचा भंग ज्ञानेशकुमार यांनी केला. एकप्रकारे संविधानाचा व देशाच्या लोकशाहीचाच खून केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश धाराशिवकर, जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी आदींज अन्य प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.