सोलापूर – महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ व कला संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात येणारी शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) ग्रेड परीक्षा दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. राज्यभरात ११९६ केंद्रावर सुमारे ७ लाख ५० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील ५१ केंद्रातून २६,१८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये एलिमेंटरीचे १५,१४५ तर इंटरमिजिएटचे ११,०४० विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक १२७७ विद्यार्थी केंद्र क्र. १०९०१३ लोकमान्य विद्यालय, पंढरपूर येथून बसले आहेत.
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेत ए श्रेणीस ७, बी श्रेणीस ५ व सी श्रेणीस ३ सवलतीचे गुण दिले जातात. तसेच ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग प्रवेशावेळी प्राधान्य दिले जाते, अशी माहिती राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे सहसचिव शांतप्पा काळे यांनी दिली.
*वेळापत्रक असे -*
– *२८ सप्टेंबर (एलिमेंटरी):* वस्तुचित्र स. १०.३० ते १.००, स्मरण चित्र दु. २.०० ते ४.००
– *२९ सप्टेंबर (एलिमेंटरी):* संकल्पचित्र स. १०.३० ते १.००, भूमिती व अक्षरलेखन दु. २.०० ते ४.००
– *३० सप्टेंबर (इंटरमिजिएट ):* स्थिरचित्र स. १०.३० ते १.३०, स्मरण चित्र दु. २.३० ते ४.३०
– *१ ऑक्टोबर (इंटरमिजिएट):* संकल्पचित्र स. १०.३० ते १.३०, भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन दु. २.३० ते ५.३०
—–
Post Views: 8