अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे विद्यार्थिनींमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांना आपल्या हक्कांची व कर्तव्यांची माहिती व्हावी या उद्देशाने कायदेविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अँड. सौ. हसीना वजीर शेख यांनी विद्यार्थिनींना कायद्याच्या विविध तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. भारतीय संविधान, मूलभूत हक्क व कर्तव्ये, महिला व बालकांचे हक्क, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अँड. सौ. हसीना वजीर शेख यांनी समर्पक उत्तरे देत कायद्याबाबतच्या शंकांचे निरसन केले. कायद्याचे ज्ञान प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असून, आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थिनींमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण होऊन त्यांना आपल्या हक्कांची व जबाबदाऱ्यांची जाणीव झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात मॅडम यांनी केले, तर आभार रणनवरे मॅडम यांनी मानले.
Post Views: 17