अकलूज – महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई या संस्थेची सन 2025-26 या वर्षाची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. 28/09/2026 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाली.
सदर सभेस साखर संघाचे अध्यक्ष मा. पी. आर. पाटील, उपाध्यक्ष प्रताप ओव्हाळ, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, जयप्रकाश साळुंखे, कल्याणराव काळे, आबासाहेब पाटील, धनाजी साठे, विवेक कोल्हे, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
या सभेस सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर-अकलूजच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मा. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होत्या.
त्यांनी आयत्या वेळच्या विषयात दोन महत्वाच्या मागण्या केल्या :
*1) ऊसाची FRP व साखर विक्रीची किंमत (MSP) लिंक करणे गरजेचे आहे.*
*2) राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ऊसाचे एकरी उत्पादन घटणार असून, सहकारी साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन

शासनाने अनुदान द्यावे.*
सदर मागणीची अध्यक्ष महोदयांनी दखल घेऊन, तसा ठराव करून शासनाकडे पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या
Post Views: 11