पंढरपूर – अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे दैवत क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पंढरपूरच्या उपकेंद्र कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या समाजहितासाठीच्या कार्याला व संघर्षमय जीवनाला उजाळा देण्यात आला. युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी व स्वयंरोजगार योजनांविषयी जिल्हा समन्वयक सौरभ मगर यांनी यावेळी माहिती दिली. तर अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकरी माथाडी कामगारांना संघटित करून त्यांना समाजात हक्क आणि सन्मान मिळवून दिला. केवळ कामगारांचेच नव्हे, तर मराठा समाजातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक बनावे, ही त्यांची दूरदृष्टी होती. अण्णासाहेबांची ही चळवळ आणि विचार आजही लाखो तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरणा देतात. असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी सांगितले
यावेळी अमोल पवार, अजित पवार, सुभाष कडलासकर, शिवचरण जाधव, मनोज गांगधरी, गौतम जाधव, शरद जाधव, रमेश पवार, सागर बागल, राजेंद्र चव्हाण, प्रशांत चव्हाण, सौ. अर्चना ताई चव्हाण, सतीश कदम, राहुल मच्छिंद्र सावंत, ओंकार खराडे, अजित पाटील, ज्ञानेश्वर बाबर, रमेश मोरे, प्रकाश गाजरे, सोमनाथ गाजरे, गणेश जाधव, शिवाजी मोरे, सोमनाथ झेंड, सचिन गंगथडे, नानासाहेब शिंदे, काका यादव, नागेश गायकवाड, हनुमंत कदम, प्रमोद कोडग, शुभम ताटे देशमुख, कृष्णा ढोकळे यांच्यासह अनेक लाभार्थी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 11