सोलापूर- तळे हिप्परगा येथील नागेश करजगी ऑर्किड महाविद्यालयाने सोलापूर डिस्ट्रिक्ट बुध्दिबळ असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या आंतरविभागीय निवड बुद्धिबळ स्पर्धेस उत्साहात सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू कृष्णा वडगीर, रितेश कौतकर यांच्यासह अनिकेत गुळेद, संकेत काकडे वेदांत गंधमल, उत्कर्ष कांबळे, मोहम्मद शेख यांच्यासह यांच्यासह मुलींमध्ये स्मृती कदम, स्वरा अपसस्तंभ व ऋतुजा पाटील यांनी प्रत्येकी तीन गुणांसह स्पर्धेत आघाडी घेतली आहे.
ऑर्किड महाविद्यालयात सुरु असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्नित ऑर्किड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे व नांदेडचे सुशांत देशमुख यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड, स्पर्धा निरीक्षक प्रा. शिवशरण कोरे, प्रा. गणेश बागल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक सुमुख गायकवाड, पात्रता समितीचे मनोजकुमार राठोड, प्रा. रुचा श्रीराम, प्रा. रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेचे सूत्रसंचालन ज्ञानदा आतकरे यांनी तर आभार प्रा. अमीर जामदार यांनी मानले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी बुद्धिबळ संघटनेचे राष्ट्रीय वरिष्ठ पंच उदय वगरे, प्रज्वल कोरे यांनी काम पाहिले तर वामन पवार, लक्ष्मीनारायण पासकंटी, हरिभा पांगळे, प्रमोद लिगाडे, विद्यार्थी क्रीडा सचिव प्रतिक दणगे, सौरभ पांढरमिसे, श्रेया पुल्ली, सानिका माने आदींनी सहकार्य केले. या स्पर्धेत सोलापूर विभागासह नागपूर, जळगाव, पुणे व कोल्हापूर विभागातील निवड झालेल्या मुले व मुलीनी सहभाग नोंदविला आहे.



















