सांगोला – ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज गुरुवार दि.१ ऑक्टोबर रोजी सायं.४ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंदा माने यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवातून समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सांगोला शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सन्मान सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष आनंद माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
Post Views: 14