बार्शी – जिजाऊ गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा व कॉलेज, खांडवी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गांधीजींच्या जीवनकार्याची आणि विचारांची माहिती देण्यात आली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर कदम यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. सांस्कृतिक विभाग प्रमुख सुवर्णा देवकर यांनी गांधीजींच्या बालपणीच्या प्रामाणिकपणाची रंजक गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना सत्य आणि निष्ठेचे महत्त्व पटवून दिले. “अपयश आले तरी चालेल, पण सत्याची आणि प्रामाणिकतेची साथ कधीही सोडू नये,” हा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख पारस कांबळे यांनी गांधीजींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि सत्य, अहिंसा व देशसेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिव वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 7