सोलापूर :श्री गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनममंगल प्रतिष्ठान ,बाळीवेस येथील मंदिराच्या भव्य प्रांगणात दिनांक दोन तीन चार ऑक्टोबर रोजी 8 ते 21 वयोगटातील जैन मुलामुलींचे शिबिर परमपूज्य मुनी श्री 108 सुप्रभ सागर महाराज, प्रणत सागर महाराज ,विप्रज्ञ सागर महाराज ,बा. ब्र . साकेत भैया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. शिबिरासाठी वयोगटांनुसार बालवर्धमान समूह ,गुरु विरागसमूह,युथ सुविशुद्ध समूह असे तीन गट करण्यात आले आहेत.शिबिरात सोलापूर व महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या150 शिबिरार्थींनी सहभाग घेतला आहे.शिबिराचे आयोजक उत्कर्ष समूह (भारत)यांनी केले आहे.गांधीनाथाचे अध्यक्ष श्री संजय गांधी,पंढरपूरचे धर्मांनुरागी श्री फडे यांनी पंडित मुकेश जैन (दिल्ली) यांच्या सुमंगल मंत्रोच्चार द्वारे ध्वजारोहण,शास्त्र भेट,गुरु चित्र आनावरण, पादपक्षालन केले.शिबिरार्थी कुमारी नेहा निलेश शहा हिने उत्कृष्ट मंगलाचरण सादर केले.शिबिर पहाटे पाच ते रात्र नऊ पर्यंत आहे.पहाटे पाच वाजता नमोकार मंत्र जागरण,प्रार्थना, योगा त्यानंतर धार्मिक शिक्षा, पूजा विधि, महाराजांना आहार देण्याची पद्धत,नवदा भक्तीने पडगाहन करणे,दुपारी धार्मिक शिक्षा क्लास झूम व विविध ॲनिमेशन पीपीटी चा वापर करून मार्गदर्शन, सायंकाळी मस्ती की पाठशाळा, सम्यक समाधान ,गुरुभक्ती, संस्कृतीक कार्यक्रम, मोटिवेशनल मार्गदर्शन, भजन, संगीत ,वैयावृत्तीइत्यादी कार्यक्रम घेतले जात आहेत.शिबिरार्थी मुलांना दोन धोती दुपट्टा, दोन टी-शर्ट, आणि मुलींना एक साडी, दोन टी-शर्ट, तसेच बॅग ,वही पेन, ओळखपत्र, तसेच जैन धार्मिक शास्त्र मोफत देण्यात आले आहे.शिबिराचे आयोजक उत्कर्ष समूह (भारत) यांनी उत्कृष्ट केले आहे मुलांना अल्पोपहार, भोजन, निवास, बस व्यवस्था करण्यात आली आहे.पंडित काळेगोरे, पंडित रवींद्र काळे, पंडित संदेश बोराळकर धार्मिक शिक्षा क्लास मार्गदर्शन करत आहेत. 8 ते 21 वयोगटातील सुविशुद्ध बाल संस्कारारोपण शिबिरातून ज्ञान, संस्कार ,साधना, आराधना ,भक्ती, संयम ,शिस्त आणि योगा यांचे पुरेपूर ज्ञान परमपूज्य विशुद्ध रत्न श्रमणमुनी श्री 108 सुप्रभ सागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच निवासी शिबिर संपन्न होत आहे , नैतिक मूल्य रुजवणे, संस्कारक्षम पिढी घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
——
Post Views: 9