सोलापूर – डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या दक्षतनया नवनीत पुकाळे, आदिती दीपक चौगुले व गौरव चंद्रकांत सरवदे या तिघांची पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
शहर बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात दक्षतनया हिने ७५ किलोवरील वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. शहर कुस्ती स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात अदितीने 50 किलोवरील वजन गटात तर गौरवने 70 किलोवरील वजन गटात अजिंक्यपद पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिघांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यांना शारीरिक शिक्षण शिक्षक डॉ. शैलेश बंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. महेशजी चोप्रा, प्रशासक डॉ. व्ही. बी. उबाळे, प्राचार्य बी. एच. दामजी, उपप्राचार्य एस. एम. जगताप तसेच पर्यवेक्षक श्री. शहाजी मादळे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
——
























