(पेन्शनर्सच्या प्रश्नांना मिळाली उत्तरे)
वार्षिक सभेत संघटनेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पेन्शनर्सच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आयोजित पेन्शनर्स मीटमध्ये सभासदांनी आपल्या अडचणी व प्रश्न थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडले. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आवश्यक ती माहिती दिल्याने अनेक सभासदांचे समाधान झाले. पेन्शनर्सच्या हिताचे प्रश्न सातत्याने आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेची एकजूट, परस्पर सहकार्य आणि सभासदांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
(नवीन कार्यकारिणीची घोषणा)
आगामी तीन वर्षांसाठीच्या कार्यकारिणीची घोषणा निवडणूक प्रमुख विलास पोतदार यांनी केली. नव्या कार्यकारिणीत विश्वास पटवर्धन – अध्यक्ष, सुधीर पवार – जनरल सेक्रेटरी, दिलीप नाडकर्णी – सचिव आणि विष्णू मुकिम – कोषाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली.
(उत्कृष्ट कार्याचा पुरस्कारांनी गौरव)
कार्यक्रमात संघटनेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रवीण कुलकर्णी यांना कै.एल. एन. पाबळकर सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच अविनाश देशपांडे आणि अविनाश सदाशिव देशपांडे यांना कै. वासुदेव व्ही. आणि कै. उमाबाई वासुदेव गंधे पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘संवाद’ मासिकातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते वाल्मिक दाभाडे, श्रीमती माधवी मसुरकर आणि उत्तम वाडेकर यांनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
(पुणे येथील पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान)
या भव्य मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय उपकेंद्र पुणेचे सचिव श्री. सुहास गंडी, अध्यक्ष श्री. विजय शिवशरण आणि समस्त कार्यकारिणी सदस्य आणि ६६ स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सुमारे ११०० सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
नव्या महाराष्ट्र सर्कलच्या पहिल्याच मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा संघटनेच्या भक्कम संघटनशक्तीचे आणि सभासदांच्या सक्रिय सहभागाचे प्रतीक ठरला. पेन्शनर्सच्या हितासाठी एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत मेळाव्याची सांगता झाली.






















