सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 26 वर्षीय तरुणाने रेल्वे खाली उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना कंबर तलावाजवळ रविवारी सायंकाळी उघडकीस आली .
संतोष बबन कांबळे (वय 26 रा. शिवगंगानगर भाग 4, कुमठानाका सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह छत्रपती संभाजी तलावा जवळील रुळाजवळ रेल्वेच्या धडकेत मयत अवस्थेत त्याचा मृतदेह स्थानिक लोकांना आढळला. ही खबर मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवलदार सुरवसे यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह शव विच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता दाखल केला.मयत संतोष कांबळे हा अविवाहित असून तो गवंडीचे काम करीत होता.त्याला दारूचे व्यसन होते. त्याने नशेत आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे
Post Views: 10