सांगोला – सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य अतुल वाघमोडे यांच्या मातोश्री कै.सौ.अपर्णा अरुण वाघमोडे यांच्या ५ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून वाघमोडे परिवाराच्या वतीने दत्त मंदिर, कडलास येथे पंढरपूर येथील हभप.तुळशीदास शंकर रसाळ यांच्या हस्ते आपुलकी प्रतिष्ठानला साउंड बॉक्स व माईक भेट देण्यात आला. यावेळी अतुल वाघमोडे, अरुण वाघमोडे, अवधूत वाघमोडे, डॉ.एम.ए.अनुसे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेश चौगुले, चंद्रशेखर कवडे, प्रमोद दौंडे, डॉ.अनिल कांबळे आदींसह गुरुदत्त बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गायकवाड यांनी केले. अपर्णा वाघमोडे यांच्या स्मृती जपत सामाजिक कार्यासाठी दिलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.