बार्शी – दक्षिण भारतात तंजावर (तमिळनाडू) येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गौडगांवचे सचिव पंडितराव लोहोकरे यांना छत्रपती बाबाराजे भोसले यांच्या हस्ते सरफोजीराजे शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. संमेलनास अध्यक्ष डॉ. शरद गोरे, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, शुभांगी काळभोर, रवींद्र पाटील, अप्पासाहेब गुरव, विकास भोसले, ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भातगुणकी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.