बार्शी – तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे संघाच्या १७ वर्षीय मुलांच्या संघाने सिल्व्हर ज्यूबली प्रशालेचा ७ गडी राखून पराभव करीत विजेतेपद कायम राखले. सदरील स्पर्धा सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या मैदानावर पार पडल्या. १७ वर्ष मुले गटात झालेल्या अंतिम सामन्यात सिल्व्हर ज्यूबली प्रशालेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व निर्धारित ८ षटकात ५ बाद ४५ धावा केल्या. सुलाखे हायस्कूलच्या प्रणव जाधवर, कृष्णा गुळवे, शंभु विधाते, वरद चौरे, फैजान करमाळकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. फैजान करमारळकर, प्रणव जाधवर, वरद चौरे यांनी प्रत्येकी १ बळी मिळावला. ४५ धावा सुलाखे प्रशालेने ६.३ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात काढून विजय संपादन केला. सुलाखेकडून कर्णधार विराट भिसे याने सर्वाधिक २४ धावा काढल्या त्याला अनुकल्प जाधवर, प्रणव जाधवर,सुशांत शेट्टी यशराज घाडगे यांनी उत्तम साथ दिली. संघातील सर्व खेळाडूंनी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, व फलंदाजी या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.१७ वर्ष मुली गटात सेंट जोसेफ संघ विजयी झाला तर सुलाखे हायस्कूल संघास उपविजय पद मिळवले. १९ वर्ष गटात झाडबुके कॉलेज विजयी तर सुलाखे संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेते पद प्राप्त केले. सुलाखेचा खेळाडू मुस्तफा सय्यद याने स्पर्धेतील एकमेव अर्धशतक केले.सर्व संघाना कोच सुहास देशमुख यांनी तसेच क्रीडाशिक्षक संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. विजयी संघाना सेंट जोसेफ स्कूलच्यावतीने करंडक प्रदान केले. संघाचे बार्शी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, मुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले.
संघातील खेळाडू विराट भिसे, प्रणव जाधवर, श्रीहर्ष देशमुख, अनुकल्प जाधवर, ऋग्वेद देशमुख, वरद चौरे, शंभू विधाते, कृष्णा गुळवे, फैजान करमाळकर, अमित पोकळे, हर्षवर्धन कदम, यशराज गाडगे, सुशांत शेट्टी, इशान देशपांडे, रत्नेश राऊत.संघास कोच सुहास देशमुख सर व क्रिडाशिक्षक संतोष पवार, तालुका क्रीडा समन्वयक समीर वायकुळे, प्रमोद माळी, सुहास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 53