वळसंग – शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह देशभरात सुरू असतानाच, धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री रेणुकाचार्य नवरात्र महोत्सव मंडळाच्या ज्योत सभासदांनी भक्ती आणि आदराचा एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अर्ध शक्तिपीठ श्री सप्तशृंगी माता गड (वणी, जि. नाशिक) येथून मंडळाच्या सभासदांनी अत्यंत कडक शिस्तीत आणि भक्तीमय वातावरणात पायी ज्योत आणण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासाचा आणि धार्मिक सोहळ्याचा खर्च सर्व सभासदांनी स्वतःच्या खिशातून (स्वखर्चाने) केला आहे.
यात्रा सुरू होण्यापूर्वी सप्तशृंगी गडावर आदिशक्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुजारी शांतविरप्पा जवळकोटे ज्योत प्रमुख, गणपती जेऊरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योत आण्णायात आला.त्यानंतर ‘आई राजा उदो उदो’ आणि ‘जगदंब-जगदंब’ च्या जयघोषात मुख्य मंदिरातील पवित्र अग्नीतून ही नवरात्र ज्योत प्रज्वलित करण्यात आली. हातात पवित्र ज्योत घेऊन चालणाऱ्या भाविकांचा उत्साह आणि शिस्त पाहून संपूर्ण गड परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
स्वखर्चातून अखंड सेवा
आजकालच्या काळात सार्वजनिक महोत्सवांमध्ये वर्गणी किंवा देणग्यांवर भर दिला जात असताना, श्री रेणुकाचार्य नवरात्र महोत्सव मंडळाच्या सभासदांनी एक नवा पायंडा पाडला आहे.
Post Views: 21