वैराग – सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि शांततामय वातावरणात पार पडला. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली “No DJ, No Dolby, No Laser Light” या संकल्पनेला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या बार्शीतील आझाद गणेश मंडळास ‘जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील संवाद हॉलमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाचे अध्यक्ष सुरज वरीदे यांना मानचिन्ह (ट्रॉफी) व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारंपरिक मिरवणुकीवरील अवाजवी खर्च व प्रदूषण टाळून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृती आणि सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल ही निवड करण्यात आली. या प्रसंगी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 15