मंगळवेढा – मंगळवेढ्याचे जेष्ठ पत्रकार शिवाजी पुजारी यांच्या बँक अकाऊंटला अचानक 2 लाख रुपये जमा झाल्याने त्यांनी याबाबत बँकेत जावून चौकशी केली व सदरचे पैसे प्रामाणिकपणे ज्याचे होते त्याला परत करुन पत्रकारितेतील विश्वास अधिक दृढ केला आहे.
या घटनेची हकीकत अशी, सन 2021 मध्ये पत्रकार शिवाजी पुजारी(रा.ब्रह्मपुरी) यांचा ऊस येणकी येथिल जकराया साखर कारखान्याला गेल्याने त्यांचे मंगळवेढा येथील शाखा जकराया बँकेत खाते उघडण्यात आले होते. या खात्यावर दि.7 ऑक्टोबर रोजी 5 वाजता 2 लाख जमा झाल्याचा मोबाईलवर त्यांना मेसेज आला. याची पडताळणी करण्यासाठी पुजारी हे गुरुवारी सकाळी 11 वाजता जकराया बँकेत गेल्यावर तेथील कर्मचारी ठेंगील यांनी याबाबत वटवटे येथील मुख्यशाखेकडे चौकशी केली असता सदरचे 2 लाख हे ऊसतोडणी ठेकेदार शिवाजी दगडू पाटील यांच्या ऐवजी शिवाजी दगडू पुजारी यांच्या नावावर बँकेत जमा झाले होते. ते 2 लाख पत्रकार पुजारी यांनी तात्काळ प्रामाणिकपणे वटवटे शाखेकडे वर्ग करून सदर ऊस ठेकेदाराला परत केले. दरम्यान पैसे परत केल्यानंतर येथील कर्मचार्यांनी पत्रकार पुजारी यांचे अभिनंदन केले.
Post Views: 19