बार्शी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं १ उपळाई (ठों) येथे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेस भेट दिली व शाळेतील परसबागेची पाहणी केली. शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे व विद्यार्थ्यांनी परसबागेचे सादरीकरण केले. नंतर गाईड पथकाचे व बुलबुल पथकाचे संचलन स्वीकारले. शाळेच्या भौतिक सुविधाचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संगणक प्रयोगशाळा, इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड देण्याचे मान्य केले. शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी नाटके, केंद्रप्रमुख श्रीराम आगलावे, मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे, सर्व अधिकारी व पदाधिकारी, तसेच शाळेतील शिक्षक मनोज देशमुख, राजेंद्र लोंढे, गोरोबा यावलकर, श्रीमती.सुनिता उकिरडे, श्रीमती.वंदना कुलकर्णी, श्रीमती.राजकन्या वलसे,श्रीमती.रेहाना तांबोळी, श्रीमती.वर्षा लिमकर व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 11