मंगळवेढा – महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “सेवा संकल्प अभियान अंतर्गत “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती मंगळवेढा व ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमानाने आठ बालकांच्या टंगटाय रिलीज शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी ,नोडल ऑफिसर RBSK डॉ सय्यद यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर व मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलोचना जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय सोलापूर चे जनरल सर्जन डॉ.महेश कोडलकर,ग्रामीण रुग्णालय सांगोलाचे भुलतज्ञ डॉ.उत्तम फुले व ग्रामीण रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ.सुरज साठे सर यांनी या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या.
टंग टाय ही जन्मजात अवस्था असून यात जिभेखालील पातळ त्वचेचा तंतू (फ्रेनुलम) लहान किंवा घट्ट असतो. त्यामुळे जीभ पूर्णपणे वर-खाली किंवा पुढे हलविण्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे बाळांना स्तनपान करताना अडचण येऊ शकते तसेच मोठ्या मुलांमध्ये बोलताना काही अक्षारांच्या उच्चारात त्रास होऊ शकतो.टंग टाय रिलीज या लहान व सुरक्षित शस्त्रक्रियेमुळे जिभेची हालचाल सुधारते, स्तनपान सुलभ होते, बोलण्यातील अडचणी कमी होतात आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होते.
या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका वैशाली शिंदे,तेजश्री मेटकरी ,रुपाली कुलकर्णी, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल चौगुले ,डॉ.शिरीष कुलकर्णी, डॉ. प्रवीण माने,डॉ.ऋतुजा गायकवाड, डॉ.स्नेहा गंदगे, डॉ.धनश्री केंदुळे,औषध निर्माण अधिकारी रेश्मा सरडे,अविनाश पट्टणशेट्टी,विवेकानंद कसबे, आरोग्य सेविका सुरेखा खरात,सुनिता सातालोलू, पूजा वागदरकर व रुग्णालयातील ,तसेच सिद्धराम चनशेट्टी ,शाहीन तांबोळी ,माधुरी गायकवाड बाबासाहेब शिवशरण, सिंद्धू माने , आदि अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 14