सोलापूर – राज्यस्तरावरील महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई यांचेवतीने घेण्यात आलेल्या ज्योतिषशास्त्री परीक्षेत सोलापूर येथील भास्कराचार्य ज्योतिष मंडळाचे एकूण २२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे येथे भावे हायस्कूलमध्ये महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पदवीदान समारंभात श्री. महेंद्र वेदक, केंद्रीय सहमंत्री व अ.भा. सहसत्संगप्रमुख विश्व हिंदू परिषद तसेच श्री. विजय जोशी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते ज्योतिषशास्त्री पदवी देवून सन्मानीत करण्यात आले.
या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मंदार सुकटे, देवेश पाटील, शिवकुमार हिरेमठ, सौ. पद्मावती शिवगुंडे, तुकाराम तुळशीगार, सुनिल बाहेरमठ, अंजनेंजय पुराणिक, सौ. विद्या गुर्रम, चंद्रप्रकाश जोडमोटे, सुधाकर कामुर्ती, सौ. कविश्री स्वामी, प्रविण पेद्दापल्लीवार, कु. स्नेहल भावार्थी, संजय हंचाटे, भास्कर जमादार, पुरुषोत्तम कैरमकोंडा, सदानंद दशपुत्रे, सौ. स्मिता लवटे, पंचाक्षरी स्वामी, पंचाक्षरी स्थावरमठ, नितीन बापट, गणेश व्यास, सागर यंगलदास यांचा समावेश आहे.
याच वर्गातील आदर्श विद्यार्थी कै. देवराज यनगंटी यांचे परीक्षेच्या निकालानंतर झालेल्या आकस्मिक निधनामुळे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांना मंडळाचे अध्यक्ष तुषार कुलकर्णी, जगदीश कारंजकर, माधव कुलकर्णी, हरेकृष्ण नल्ला, राघवेंद्र अरकाल, वैनतेय जोशी, विलास आधेली, सुरेश मोहिते, जे.पी. स्वर्णकार यांचे मार्गदर्शन लाभले. भास्कराचार्य ज्योतिष मंडळाच्या परीक्षा विभाग प्रमुख श्रीमती किर्तीलक्ष्मी अत्रे, सचिवा सौ. अंजली लंके, सौ. मधुरा कुलकर्णी, नाना फटाले, गुरुशांतय्या स्वामी अक्कलकोट यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सोलापूरातील ज्योतिष अभ्यासकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सोलापूरच्या ज्योतिष परंपरेला साजेल असे काम केल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे आणि सोलापूरला ज्योतिष शास्त्राचा इतिहास असून याचे महत्व महाराष्ट्रातून नाशिक व सोलापूरमध्ये अधिक आहे. समाजातील सर्व स्तरातून ज्योतिषांकडून वैयक्तिक मार्गदर्शन घेतले जाते. भारतातील तीन ते चार ठिकाणीच ज्योतिष शास्त्राचा जास्त अभ्यास केला जातो उदा. बिहारमधील गया, उत्तर प्रदेशमधील वाराणसी (काशी), महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि सोलापूर अशा चार ठिकाणी ज्योतिष शास्त्राचा जास्त अभ्यास केला जातो. सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी नाव कमावल्यामुळे भास्कराचार्य ज्योतिष मंडळाचे २२ विद्यार्थी एकाच वेळेला प्रथम वर्गाने उत्तीर्ण झाल्यामुळे तुषार कुलकर्णी, कारंजकर, एम. आर. कुलकर्णी, विलास अदेली आणि वैनतेय जोशी, अरकाल व नल्ला यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले. या यशाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समारोप प्रसंगी देवेश पाटील यांनी आभार व्यक्त केले.
भास्कराचार्य ज्योतिष मंडळाचे आणखी एक परंपरा आहे की समाजातील सर्व धर्म व जातीतील लोकांना सामावून घेऊन ज्योतिष शास्त्र हा गहन व अतिशय अवघड असलेला विषय सोप्या भाषेत समजावून सांगितला जातो. त्याबरोबरच खगोलशास्त्राची जाणीवपूर्वक ओळख करुन दिली जाते. खरतर ज्योतिषशास्त्र हा मानवाला ङ्गक्त अवकाशातल्या निरीक्षणामधून जन्म झालेला शास्त्र आहे. त्याला शास्त्रीय आधार असूनही राजाश्रयापासून अजूनही वंचित आहे. पण याबरोबरच राजाश्रय किंवा उत्पन्नाचे सरकारी मार्ग नसले तरी सातत्याने तुषार कुलकर्णी आणि भास्कराचार्य ज्योतिष मंडळ सोलापूर यांनी जाणीवपूर्वक प्रयत्नरत राहून ज्योतिष विद्या जतन केली आहे आणि ती वाढवण्यासाठी सातत्याने केलेले विशेष परिश्रम आणि मार्गदर्शन हे खरोखरच उल्लेखनीय समाजकार्य आहे.
Post Views: 7