सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण, सोलापूर येथे कुचन प्रशालेचे देणगीदार कै. सिद्रामप्पा कुचन यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त प्रशालेतील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली होते, तर पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त अरविंद कुचन व लक्ष्मीनारायण कुचन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य युवराज मेटे यांनी आपल्या प्रास्ताविकात कै. सिद्रामप्पा कुचन यांच्या कार्याचे स्मरण करून शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व सेवाभाव अंगीकारून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, मल्लिकार्जुन जोकारे, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सपना मोरे यांनी तर आभार पर्यवेक्षिका प्रणिता सामनlल यांनी मानले.





















