अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे पारंपरिक भोंडला कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक प्रशाला समितीच्या सदस्या माने मॅडम, मुख्याध्यापिका सौ. अनिता पवार व सर्व महिला शिक्षिका यांच्या हस्ते हत्तीचे पूजन करून करण्यात आले.
भोंडला कार्यक्रमाचे महत्त्व व परंपरा याविषयी प्रशालेच्या सहशिक्षिका वृषाली थोरात मॅडम यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. पूजनानंतर पारंपरिक भोंडला गीतांच्या तालावर उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापिका, महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी गोल फेर धरून विविध भोंडल्याचे खेळ खेळले. पारंपरिक गीतांनी व उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
यानंतर प्रत्येक वर्गातून आणलेल्या खिरापती ओळखण्याचा मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थिनींना भोंडल्याच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली तसेच एकोप्याची व आनंदाची भावना वृद्धिंगत झाली. प्रशालेच्या वतीने सर्वांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका भक्ती सोनकांबळे व काजल लोंढे यांनी केले. पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.=====————— नवरात्र उत्सव व भोंडल्यानिमित्त प्रशालेचे कलाशिक्षक विशाल लिके सर यांनी अंबाबाईचे चित्र वे फळ्यावर रेखाटले …
Post Views: 8