करकंब – ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक व लोकभिमुख आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी ता.पंढरपूर, येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण पार पडले ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बळकट करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश कोपूरवाड प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे डॉ. सुहास कोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय प्रशिक्षण उस्ताहात पार पडले.या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले यामध्ये विविध प्रकारच्या १४ आरोग्य सेवा विषयांचा सहभाग होता.यावेळी सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा तसेच आरोग्य संस्थेचे गुणवत्ता कशी वाढवावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या अद्यावत ज्ञान व कौशल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.प्रशिक्षण दरम्यान भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निशा रोकडे,डॉ.ज्योती लिंगे डॉ.अमेय फुले,डॉ.सुमित्रा कुरळे,अनिल यादव (नेत्र चिकित्सक) विजया चव्हाण आरोग्य सहायिका,क्रांतिस्नेहल पाटील (शेवाळे),आरोग्य सेविका सुधामती गंगणे,आरोग्य निरीक्षक,आरोग्य सेवक,समुदाय आरोग्य अधिकारी गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Post Views: 21