सोलापूर – देगाव नाका येथे अज्ञात वाहनाला धडकून रान मांजर मंगळवारी रात्री जखमी झाले होते. इंद्रजीत पवार हे आपल्या हॉटेल कार्तिक कडे जात असताना जखमी झालेले रान मांजर पाहून इंद्रजित यांनी सर्पमित्र हर्ष गिराम यांना फोन वरून माहिती दिली. घटनास्थळी सर्पमित्र रतिकांत आणि हर्ष गिराम यांनी अलगत उचलून पोत्यात घालून सुरक्षित ठिकाणी ठेवले, आणि सर्पमित्र औदुंबर गेजगे यांना बोलवून घेतले. रान मांजर हे माणक्यातून बाद झाले होते. जखमी रान मांजराला पाणी पाजून एक पिंजऱ्यात ठेवण्यात आले. यावेळी वनविभागाचे मुन्ना नरवणे व प्रवीण जेऊरे यांच्या स्वाधीन करण्यात आले.
याप्रसंगी सर्पमित्र रतिकांत नाईकनवरे, हर्ष गिराम, श्रीकांत चंदनशिवे, संदीप ससाणे, चंद्रकांत बचुटे, अजय पवार हे उपस्थित होते.
























