टेंभुर्णी – शेतकरी संघटनेची उसाला पहिली उचल पाच हजार रूपये मिळावी ही मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने टेंभूर्णी जवळील भीमानगर येथे मंगळवार १३ रोजी दुपारी सोलापूर-पूणे राष्ट्रीय महामार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांची धरपकड करण्यात आली.कार्यकर्त्यांनी ठोस निर्णय जाहीर झाल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर व तहसीलदार संजय भोसले यांनी व पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तुमच्या मागण्या साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे पर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
उस दराबाबत केंद्रीय मंत्र्यांचे बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याने संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये चक्का जाम आंदोलन करण्याचा आव्हान केले होते.त्यासाठी आरपारची लढाई म्हणून स्वामी यांनी शेतकरी संघटनेचे वतीने माढा तालुक्यातील भीमानगर येथील “चौकामध्ये दिलीप वळसे पाटलांचा जाहिर निषेध असो”
“उसाला पाच हजार उचल मिळाली पाहिजे”,
“इथोनॉलला ७० रूपये दर मिळाला पाहिजे” “शेतकऱ्यांची लुट थांबलीच पाहिजे” अशा घोषणा देत भर उन्हात आंदोलन सुरू करण्यात आले.यावेळी पोलिसांनी आंदोलन थांबण्याबाबत विनंती केली असताना प्रशासनाकडून निवेदन स्विकारण्यासाठी जबाबदार अधिकारी न येता मंडल अधिकारी मुंडे हेच फक्त उपस्थित होते.दरम्यान आंदोलन कर्त्यांनी सरकार दुर्लक्ष करते म्हणून आक्रमक होत जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही आणि वरीष्ठ पातळीचा अधिकारी येत नाही
मागे न हटण्याची भूमीका घेतली.यावेळी तनावाचे वातावरण निर्माण झाले.शेतकरी आक्रमक होत चालले.पोलिसांनी धरपकड सुरू केली परंतु कार्यकर्ते हटले नाहीत त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले.
यानंतर माढ्याचे तहसिलदार संजय भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.तुमच्या सर्व मागण्या साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवतो असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी रस्त्यावर दुतर्फा १० किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह कदम, प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर,युवकचे प्रदेशाध्यक्ष सुर्यभान जाधव, प्रशांत पाटील,प्रताप पिसाळ, चंद्रकांत कुटे,तानाजी बागल,प्रताप गायकवाड,बापू गायकवाड यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता वाहतूक सुरळीत टेंभुर्णी पोलिसांनी केली.
ओव्होरलोड उस वाहतुक करणा-या ट्रक्टर, ट्रक यांचेवर आरटीओ कडून कारवाई करावी व बैलगाड्यांवर ही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजू शेट्टी यांनी मोबाईल वरून मार्गदर्शन केले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना कार्यकर्त्यांना फोन लावला असता त्यांनी मीही या ठिकाणी रस्ता अडवून ठेवला आहे तुम्हीपण मागणी पूर्ण झाल्याशिवाय हटू नका असा संदेश दिला |