पंढरपूर – उमा महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त अँड. प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना, “स्पर्धकांनी स्पर्धेत खेळताना आपल्या मधील कौशल्य पणाला लावून स्पर्धा खिलाडू वृत्तीने खेळली पाहिजे. यामध्ये खेळाडूंनी हार जीत न मानता स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन केले.”
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी माजी प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद परिचारक यांनी, “तायक्वांदो हा क्रीडा प्रकार असून तो स्वसंरक्षणासाठीही आहे. हा क्रीडा प्रकार आपल्या भगिनींसाठी कवच कुंडलाप्रमाणे आहे. हा खेळ आत्मसात केल्याने भगिनींमध्ये स्वसंरक्षणासाठी आत्मविश्वास येऊन निर्भयपणा वाढेल. त्यामुळेच असे क्रीडा प्रकार जीवनाचा अविभाज्य भाग बनले पाहिजेत.” असे विचार विशद केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी केले. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना उद्देशून अशा स्पर्धेच्या माध्यमातून विजेता स्पर्धक पुढे राष्ट्रीय पातळीपर्यंत कशाप्रकारे पोहोचू शकतो याविषयी मार्गदर्शन केले व सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी तायक्वांदो स्पर्धेचे निवड समितीमधील डॉ. मल्लिकार्जुन पाटील व प्रा. विजय पवार, पात्रता समिती प्रा.अनिल परमार, प्रा.गणेश जोरवर आयोजन समिती डॉ.प्रशांत तांबिले, डॉ.जगदीश चेडे व प्रा.दीपक भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागीण सर्वगोड व डॉ. सुवर्णा हजारे यांनी केले व डॉ. अविनाश देशपांडे यांनी आभार मानले.
सदर स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातून ७५ मुलींनी तर ६६ मुलांनी असे एकूण १४१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.आनंद ढवण, प्रा. डॉ. विलास बंडगर प्रा. डॉ. समाधान भगरे, प्रा. डॉ. रुपेश कुंभारकर तसेच कार्यालयीन अधीक्षक सज्जन लोंढे , पैगंबर शेख, तुकाराम लोखंडे, ज्ञानेश्वर देवमारे, शंकर रोंगे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
Post Views: 9