वैराग – ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आणि मोफत आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने वैराग येथील चिरायू हॉस्पिटल तसेच ‘आयुष्मान भारत योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’चा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा भव्य सोहळा सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता वैराग येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे शुभउद्घाटन आयुष्मान भारत मिशन (महाराष्ट्र राज्य) समितीचे अध्यक्ष श्री डॉ. ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून, या प्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी सौ. शिल्पा शेटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार राजेंद्र (राजाभाऊ) राऊत (विधान परिषद सदस्य) उपस्थित राहणार आहेत.
आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गोरगरीब व गरजू रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा आता चिरायू हॉस्पिटलच्या माध्यमातून वैराग व परिसरातील जनतेसाठी उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आव्हान करण्यात आले आहे.
Post Views: 6