रोटरी क्लब ऑफ सोलापुर युजतर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाच्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘नेशन बिल्डिंग अवॉर्ड २०२६’ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
‘नेशन बिल्डिंग अवॉर्ड २०२६’ या पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ बीना मोहन बुगले, लिटिल फ्लॉवर शाळेचे शिक्षक श्री अंबादास अशोक जाधव, डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री अमोल काळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी आदिशक्तीच्या जिल्हा अध्यक्षा रोटेरियन पारुल जयेश पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुण्या पारुल जयेश पटेल यांचा सत्कार हिंगुलांबिका देवी देवालयाचे ट्रस्टी श्रीकांत अंबुरे,बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजय पुकाळे, श्री शशिकांत रंगदळ यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी क्लबचे पदाधिकारी रोटेरियन वंदना कोपकर, संजू मेंथे, अजय डोईजोडे, डॉ. ज्योती चिडगुपकर, सत्यम दुधनकर आणि हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद हंचाटे यांची उपस्थिती लाभली.
रोटेरियन रोटरी क्लब ऑफ सोलापुर युजचे अध्यक्ष किरणकुमार मुसळे आणि सचिव रोटेरियन हिंदुराव गौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
Post Views: 20