सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरीभाई देवकरण प्रशाला, लॉन टेनिस क्लब, सोलापूर येथे शालेय शहरस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या (आयएमआयएस) खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात साईशा योगेश पुलगम हिने द्वितीय क्रमांक, तर शनाया शरणबसव हिरेमठ हिने पाचवा क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या जोरावर साईशा योगेश पुलगम व शनाया शरणबसव हिरेमठ यांची पुणे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक अजय चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी, मुख्याध्यापिका मानसी जोशी तसेच ममता बसवंती यांनी साईशा व शनाया यांचे अभिनंदन केले आणि पुणे विभागीय स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post Views: 9