सोलापूर : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. वृत्तपत्रे वाचकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रेत्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्रभाकर भंडारी, परिवर्तन लोखंडे, संजय जेऊरे आणि गणेश रायचूरकर या वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांच्या हस्ते या विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संघाचे खजिनदार विजय गायकवाड, पत्रकार किरण बनसोडे, लखन अदाटे, रवी ढोबळे, मनोज हुलसुरे, शरद येच्चे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
—
Post Views: 25