सांगोला – सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक काकासो नरूटे यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस तर उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे यांच्या हस्ते गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, या डॉ.कलामांच्या विचारांची आठवण करून देत अवांतर पुस्तके वाचण्याची सवय जोपासण्याचा आणि वाचनाचा हा यज्ञ अखंड तेवत ठेवण्याचा संकल्प करण्यास सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, प्रशाला उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 9