श्रीपूर – ऊस उत्पादक शेतकरी दुष्काळ , खतांच्या वाढत्या किमती तर दुसऱ्या बाजूला कारखानदार बॅन्केचे हप्ते , टॅक्स ,व राजकारणासाठी वापरून उरलेल्या पैशातून शेतकर्यांना भाव द्यायचा असा व्यवहार चालू आहे . अशा पद्धतीने आम्ही काम करू देणार नाही . यावेळी आमची सरकारकडे मागणी आहे साखरेचा गेल्या १५ वर्षा पासून स्थिर असलेला साखरेचा भाव ३१ रु . वरून ५० रु . झाला पाहीजे तसेच साखर कारखानदारांनी ५ हजार रु . टनास भाव दिलाच पाहीजे हे होत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राहूल बिडवे यांनी प्रतिपादन केले . श्रीपूर येथिल छत्रपति चौकात शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी रयत क्रांती संघटनेचे दीपकराव भोसले , समाधान फाटे , राहूल बिडवे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदयसिंह माने देशमुख , बाळासाहेब धाईंज, विरेंद्र पाटील ,मदनसिंह जाधव ,कमलाकर माने – देशमुख , आरपीआय चे प्रा . नरेंद्र भोसले , भाजपा ओबीसी नेते सतिश कुलाळ , गोपाळराव धार्गे देशमुख ,मराठा आरक्षण समितीचे सयाजी गायकवाड , स्वाभीमानीचे दत्ताभाऊ भोसले, शिवम काशीद , भिमराव भुसनर , सुरज पाटील , विशाल साठे , दिनेश लोखंडे, अविनाश साठे , नितीन गायकवाड , राज मुलाणी, सागर देठे, रोहीत काळे, उपस्थित होते .
याप्रसंगी समाधान फाटे , दिपक भोसले यांनी आपल्या मनोगता मध्ये कारखाने काटा मार करून शेतकर्यांची लूट करतात असा आरोप करून सरकारही शेतकऱ्यांच्या हालाकीस कारणीभूत असल्याची सडकून टिका केली . खानंतर आंदोलना नंतर शेतकरी संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले हे निवेदन पोलिस उपनिरिक्षक विक्रम साळुंखे नसेच करिष्मा वनवे यांनी स्वीकारले .
तर पोलिस निरिक्षक निरज उबाळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – .
शेतकर्याचे मरण हे सरकारचे धोरण .
सद्य स्थितीत शेतकरी वर्ग अडचणीत आहे . अशा परिस्थितीत तामीळनाडूचे मुख्यमंत्री थलपती हे ऊसाला ७०० रु . अनुदान देतात . मात्र शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे सापले सरकार शेतकरी मरत असताना तेच आमचे धोरण म्हणत आहे हे विदारक चित्र आहे .
Post Views: 8