पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत उमा महाविद्यालय येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेमध्ये उमा महाविद्यालयाने घवघवीत यश संपादित केले.
ओमुलांमध्ये अय्यान तांबोळी (५४ किलो वजनी गट) गोल्ड मेडल, रेयान तांबोळी (५८ किलो वजनी गट) गोल्ड मेडल, गौरव केसकर (६३ किलो वजनी गट) गोल्ड मेडल, आमिर पठाण (८० किलो वजनी गट) गोल्ड मेडल, स्वप्निल धोत्रे (८७+किलो वजनी गट) सिल्वर मेडल, आदित्य सुतार (६३ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल, शुभम जाधव (७४ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल, व रोहन काळे (८७ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल, तर मुलींमध्ये साक्षी सागर (४५ किलो वजनी गट) सिल्वर मेडल, दिपाली पवार (५३ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल दरकासा सय्यद (५७ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल, अमृता रोंगे (७३ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल, प्रणोती कोळी (६७ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल, व मयुरी नागरहळी (७३+ किलो वजनी गट) ब्राँझ मेडल प्राप्त केले.
या सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष मुकुंदराव परिचारक, सचिव राजगोपालजी भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त अॅड. प्रणव परिचारक, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद परिचारक, इतर संस्था पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण, कार्यालयीन अधीक्षक सज्जन लोंढे तसेच गोरख खताळ व पैगंबर शेख, तुकाराम लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 9