बार्शी – पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराष्ट्र विद्यालय, बार्शी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर भरघोस यश संपादन केले आहे. विद्यालयातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत प्राविण्य मिळवत आगामी पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
भालाफेकमध्ये आकाश पंढरे प्रथम, थाळीफेकमध्ये ओवी मेहेर द्वितीय. भालाफेक स्पर्धेतत १७ वर्षे वयोगटातील आकाश संतोष पंढरे याने आपल्या अचूक निशाण्याने व उत्कृष्ट फेक कौशल्याने सुवर्ण कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या थाळीफेक प्रकारात कु ओवी अजय मेहेर हिने कसून सराव करत द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी. डी. पाटील, योगेश उपळकर आणि विकास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समिती अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मीराताई यादव, एस. बी. शेळवणे, प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.