बार्शी – बार्शी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावतीने पथ सऺचलनाचे आयोजन करण्यात आले होते. माॅडेल हायस्कूलच्या मैदानावरून संचलन निघाले. येथे प्रथम भगव्या ध्वजाचे पूजन सौ. रेणुका शिरीष जाधव, सौ. पुजा विशाल बुडूख व सौ. किरण अविनाश ढाळे यांच्या हस्ते करुन सऺचलानास सुरवात करण्यात आली. शहरातील महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, आझाद चौक, टिळक चौक, आडवा रस्ता, पांडे चौक या मार्गावरती सऺचलन पार पडले शहरातील महिलाभगिनि यांनी राऺगोळी काढून आणि नागरीकांनी पुष्पवृष्टी करुन सदर सऺचलनाचे स्वागत केले सऺचलन पाहण्यासाठी नागरिकांची दुतर्फा गर्दी होती सऺचलनाचा समारोप मॉडेल हायस्कूल येथे करण्यात आला. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर डॉ क्टर वकिल व्यापारी प्रतिष्ठीत नागरिक व्यावसायिक आणि महिला उपस्थित होते. जिल्हा कार्यवाह श्री ऋषिकेश कुलकर्णी मा.तालुका संघचालक श्री आनंद सोमाणी तालुका कार्यवाह श्री. अरुण ग्रामोपाद्धे आणि सर्व स्वऺयसेवकानी मेहनत घेऊन संचलन यशस्वीपणे पार पाडले.
Post Views: 22