सोलापूर : नवरात्रनिमित्त पूर्व भागातील तेलुगु समाजात प्रसिद्ध ब्रतुकम्मा उत्सव शुक्रवारी अष्टमीदिनी मार्कंडेय उद्यानात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध तेलुगू लोकगीत ‘ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो…’ म्हणत व फेर धरत शेकडो महिलांनी या उत्सवाचा आनंद घेतला.
भाजपा शहर मध्य विधानसभा मध्य मध्य मंडल अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शहर मध्ये चे दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या सौभाग्यवती मोनिका वहिनी कोठे,माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहर भाजपचे शहराध्यक्षा सौ रोहिणीताई तडवळकर, स्थायी समिती सभापती सौ रंजीताताई चाकोते, महिला बालकल्याण समिती सभापती सौ निर्मलाताई जंगम, नगरसेविका राजश्रीताई धोडमनी, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेवक शेखर इगे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक विजय चिप्पा, शंकर अण्णा चौगुले, भाजप शहर उपाध्यक्ष अंबादास बिंगी, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, भाजपा ज्येष्ठ सुकुमार सिद्धम, नागनाथ सोमा, रमेश मिट्टा दास भंडारी आदींसह प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सुख, शांती,ऐश्वर्य, संतान प्राप्तीसाठी तसेच उत्तम वर मिळण्यासाठी महिला-मुली हा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करतात.
या कार्यक्रमात सहभागी महिलांनी विविध रंगीबेरंगी फुलांचे गोपुर बनवुन त्यामध्ये हळदीने बनविलेल्या गौरीदेवीची (ब्रतुकम्मा) प्रतिष्ठापना केली. त्यानंतर प्रसिद्ध तेलगू लोकगीते म्हणत ‘ब्रतुकम्मा’ भोवती फेर धरला.
उत्कृष्ट ब्रतुकम्मा सादर करणाऱ्या भगिनींना चाटला पैठणी,व नगरसेविका श्रीमती सुनिताताई कामाठी परिवारातर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















