पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर यांना बहुजन सत्यशोधक संघ या राष्ट्रीय संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहीते पाटील यांच्या हस्ते अविनाश जेऊरकर यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल ओव्हाळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अविनाश जेऊरकर म्हणाले हा सन्मान माझा एकट्याचा नसुन मला नेहमी साथ देणाऱ्या जनतेचा व सहकाऱ्यांचा आहे. या पुरस्कारामुळे मला समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असुन यापुढेही अधिक जोमाने समाजकार्य करणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश जेऊरकर यांचे सोलापूर जिल्ह्या परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागिरदार, अष्टविनायक गणेश मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, वीरशैव लिंगायत समाज, माजी विद्यार्थी संघटना आठवणी 95 यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो _ माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील माहीते पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार स्विकारताना अविनाश जेऊरकर.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























