सोलापूर – सोलापूर शहरात सकाळी रोटरी सोलापूर परिवारातर्फे जागतिक पोलिओ दिनानिमित्त शनिवार, पल्स पोलिओ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आली. पोलिओमुक्त समाजाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच पोलिओ प्रतिबंधाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा य रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
या रॅलीमध्ये सोलापूरमधील सर्व रोटरी क्लबचे सदस्य, IMA चे सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, रोटरी स्कूल्समधील विद्यार्थी, शिक्षक तसेच सोलापूरमधील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले, असे आवाहन रोटरी सोलापूर परिवारातर्फे करण्यात आले आहे.सोलापूर शहर विविध शाळा,लहान मुले सहभागी झाले दिनांक: शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ वेळ: सकाळी ८:०० ते १०:००रॅलीचा प्रारंभ: बिग बाजार, सोलापूर रॅलीचा समारोप: IMA, डफरीन चौक, सोलापूर येथे करण्यात आले.
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती आणि सामूहिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक बालक पोलिओपासून सुरक्षित राहावे आणि भारताचे पोलिओमुक्त भविष्य कायम राहावे, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या जनजागृती रॅलीमध्ये सर्व रोटरी सदस्य, IMA सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्यदायी आणि पोलिओमुक्त भारताच्या निर्मितीस हातभार लावला.
Rtn. मितेश पंचमिया(अध्यक्ष, रोटरी)परिवार, सोलापूर
Rtn. किरणकुमार मुसळे(सचिव, रोटरी परिवार, सोलापूर
Post Views: 32