अक्कलकोट – आज नागणसूर येथील तुप्पीन मठाचे श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, यांच्या १४ व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला जगद्गुरु ‘बसवलिंग रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा व सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
यंदाचा प्रतिष्ठेचा जगद्गुरु बसवलिंग रत्न पुरस्कार नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सरपंचगौडा बी.पाटील, आमदार एम.वाय.पाटील, अमोलराजे भोसले व सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व
विविध मठाधीपतींच्या दिव्य सान्निध्यात
तुप्पीन मठाचे डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभहस्ते येथील
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे, विश्व फाउंडेशन शिवपुरीचे संस्थापक डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले,
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज, हृदयरोगतज्ज्ञ डॉ.शैलेश पाटील, कलाकार ईश्वर हिरेमठ कनकूर यांना प्रदान करण्यात आला.
यानंतर बसवलिंग महास्वामी, ज्ञान योगाश्रम, बिदर, गुरुपादलिंग महास्वामी, विरक्त मठ, पुरवण बळकवाड, अभिनव पुंडलिक महाराज, पुंडलिकनगर गोधन, अभिनव शिवलिंग महास्वामी, विरक्त मठ, शेळगी शंकर शिवाचार्य, हिरेमठ, नागणसूर, अभिनव शांतलिंग शिवाचार्य, पंचगंगा, हिरेमठ, आलमेल रुद्रगुप्ती शिवाचार्य यांच्या दिव्य सान्निध्यात व वरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने ४२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थानचे कार्यसेवक विद्याधर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. धर्मसभा सह विविध कार्यक्रम झाले. या प्रसंगी २१ हजार सुवासिनींचा ओटी भरण्याचा भव्य कार्यक्रम आणि सर्व भाविकांसाठी पुरणपोळी व तुपाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागृत हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, कांतू धनशेट्टी,
अक्नबळ्ळ, रमेश बाके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, संतोष पराणे, सचिन किरनळ्ळी, श्रीकांत झिपरे, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, सुनिल पवार, अंकूश केत, डॉ.राजू मलंग, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, बाळासाहेब एकबोटे, रमेश शिंदे सर, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, स्वामीनाथ मुसळे, बसवराज करूटे आदींसह नागणसूर परिसरातील तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरीक भाविक आदीसह विवीध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यांच्यासह अनेक मठाधिपती व संत-महंत यांचे दिव्य सानिध्य लाभले.
सायंकाळी ४ वाजता श्रींच्या भव्य प्रतिमेसह वचन साहित्याची भव्य मिरवणूक नागणसूर गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. रांगोळीची सजावट, जगद्गुरु बसवलिंग शिवयोगी यांचे भव्य चित्र आणि धर्मध्वज हे आकर्षणाचे केंद्र ठरले.धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी सजलेला हा पुण्यस्मरणोत्सव भाविकांसाठी संस्मरणीय ठरला.
Post Views: 20