पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शिवामृत दुध संकलन केंद्रातर्फे दुध उत्पादक सभासदांना दिवाळीनिमीत संस्थेस जास्त दुध पुरवठा करणाऱ्या व चांगल्या प्रतीचा दुध पुरवठा करणाऱ्या सभासदांना पिलीवचे माजी सरपंच तथा नागरी आघाडीचे अध्यक्ष अमोल मदने पाटील, शिवामृत दुध संघाचे संचालक दादासाहेब शिंगाडे, शिवामृत नितीन नाईकनवरे, चेअरमन अरुण मदने,कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील, यांच्या हस्ते बोनस, ट्राफी, फेटा बांधुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .सर्वात जास्त दुध पुरवठा करणाऱ्या मध्ये प्रथम सतीश थिटे, दुसरा क्रमांक दादा कपने, तिसरा क्रमांक साधना सुळ ,चौथा ज्ञानेश्वर गोरे, पाचवा अण्णा लेंगरे, चांगल्या प्रतीचे दुध पुरवठा करणारे तानाजी सुळ ,बापुराव मदने ,साधना सुळ ,अजित कचरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .यावेळी माजी सरपंच अमोल मदने यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी वर्षभर काबाड कष्ट करुन राञीचा दिवस करुन दुध पुरवठा केला .ऐन दुष्काळात संस्थेने बोनस देऊन मदत केली .यावेळी सुञसंचालन ठेंगल यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन अरुण मदने यांनी केले. यावेळेस दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संखयेने उपस्थित होते . फोटो _ पिलीव येथे शिवामृत दुध संकलन केंद्रातर्फे बोनसचे वाटप करताना अमोल मदने ,दादासाहेब शिंगाडे, संजय पाटील, अरुण मदने व इतर मान्यवर.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















