सोलापूर – राज्य शालेय हॉलीबॉल स्पर्धेत मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले.
मिनचे (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये छ. संभाजीनगरवर 2-0 ने विजय संपादन केला. सेमी फायनलमध्ये नागपूर विभागाचा 3-0 ने पराभव केला. अंतिम फेरीमध्ये कोल्हापूर विभागाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला.
संघास प्रा. संभाजी चव्हाण , आबाराव गावडे, समीर शेख, संतोष सिताप, विद्यालयाची माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय खेळाडू शिवाली कुंभार, कार्तिकी गरगडे यांचे मार्गदर्शन लाभले. संघाचे प्रशालेचे प्रशासक जिल्हा सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, प्राचार्य पी. एस. शिंदे , उपप्राचार्य मधुकर माळी, उपमुख्याध्यापक राजमाने, सुपरवायझर नीलकंठ शिंदे यांनी अभिनंदन केले.
उपविजेता संघ : वैष्णवी आदलिंगे, संचिता माळी, राणी लोमटे, रिद्धी घाडगे, मनस्वी आलदर, स्नेहल चौधरी, हर्षदा पाथरूट, सिद्धी घाडगे, प्रतीक्षा दाईंगडे, संस्कृती खांडेकर, वैष्णवी काळे, अतुल्य आडके.
——
Views: 185