अक्कलकोट – कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरातील श्री स्वामी समर्थ महाराजांचे विश्रांतीस्थान असलेल्या श्री स्वयंभू गणेश मंदिर तसेच दिशानगर येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शेकडो दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव मोठ्या मंगलमय व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त दोन्ही मंदिरांमध्ये आकर्षक दीपसजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. दीपांच्या लखलखत्या प्रकाशासोबतच भक्तिमय वातावरण, देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची उपस्थिती आणि धार्मिक उत्साह यामुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
श्री स्वयंभू गणेश मंदिर हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे विश्रांतीस्थान म्हणून भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे या मंदिरातील दीपोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले होते. तर दिशानगर येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही भक्तिभावाने दिवे प्रज्वलित करून त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.
दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरातील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणाने भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली. प्रकाश, श्रद्धा आणि भक्तीचा संगम घडविणारा हा दीपोत्सव अक्कलकोटकरांसाठी विशेष आकर्षण ठरला.
पौरोहित्य गुड्डय्या स्वामी व ओंकार ग्रामोपाध्ये यांनी केले.
यावेळी पूजा स्वामी, शोभा स्वामी,
गौरी शिंदे, वैष्णवी गुरव
अलका दसले,
भाग्यश्री कुंभार, रेणुका कुंभार, सरोजिनी कुंभार, चंद्रकला कुंभार,
ज्योती कोरे, अंबिका पाटील, अंजली डिग्गे,
संगीता शेटे, पुष्पा सोड्डे, लक्ष्मी शिंदे, विजयालक्ष्मी कुंभार, समस्त वटवृक्ष महिला मंडळ, कुंभार गल्ली तरुण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Views: 52