Thursday, November 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उच्च अधिकार समितीची १,३५० कोटींच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेला मान्यता

तरुण भारतbyतरुण भारत
November 26, 2026
in soalpur
0
उच्च अधिकार समितीची १,३५० कोटींच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेला मान्यता
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १ हजार ३५० कोटी ६७ लाख रुपये खर्चाच्या सुधारित सोलापूर पाणीपुरवठा योजनेला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय उच्च  अधिकार सुकाणू समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजना (MUWREP) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
      पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी या योजनेच्या मान्यते संदर्भात माहिती दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन आदी उपस्थित होते. महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याबद्दल आमदार कोठे यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. आभार मानले. यावेळी आमदार कोठे यांनी पालकमंत्री गोरे यांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. पालकमंत्री गोरे यांनीही आमदार कोठे, महापौर विनायक कोंड्याल,नगरसेविका रोहिणी तडवळकर यांना लाडू भरवून शुभेच्छा दिल्या.
            या योजनेमुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला आधुनिक स्वरूप मिळणार असून, भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण केले जाणार आहे.योजनेअंतर्गत १२० एमएलडी आणि ३० एमएलडी क्षमतेची अशी दोन नवीन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामुळे एकूण १५० एमएलडी क्षमतेची नवीन जलशुद्धीकरण सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ३० नवीन उंच जलकुंभ आणि १० एमबीआर टाक्या उभारण्यात येणार आहेत.
          शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी ७४ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी, तर १ हजार १५३.७३ किलोमीटर लांबीच्या वितरण जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण १ हजार २२७.७३ किलोमीटर नवीन जलवाहिन्यांचे जाळे उभारले जाणार आहे. यामुळे जुन्या जलवाहिन्यांवरील ताण कमी होऊन शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचे समतोल वितरण करण्यास मदत होणार आहे.सोलापूर शहराची वाढती लोकसंख्या, विस्तारणाऱ्या नागरी वसाहती आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, जलवाहिन्या, मीटरयुक्त नळजोडण्या आणि सौरऊर्जा प्रकल्प अशा विविध घटकांचा या योजनेत समावेश आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे आधुनिकीकरण होण्याबरोबरच महानगरपालिकेच्या वीज खर्चातही बचत अपेक्षित आहे. आता या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची आणि सोलापूरकरांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्याची प्रतीक्षा असेल.
        यानंतर आता टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या योजनेत आवश्यकतेनुसार अनेक बदल होऊ शकतात. स्मार्ट सिटीतील कामे वगळून ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
 २ लाख ३८ हजार नळजोडण्यांना मीटर
या योजनेतील महत्त्वाचा भाग म्हणजे शहरातील सुमारे २ लाख ३८ हजार घरगुती नळजोडण्यांना पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याच्या वापराचे अचूक मोजमाप करता येणार असून, पाणीगळती, अपव्यय आणि अनावश्यक वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
 ८० कोटींचा सौरऊर्जा
प्रकल्पही उभारणार
पाणीपुरवठा योजनेला सौरऊर्जेची जोड देण्यात आली आहे. केगाव पार्क, शिवाजीनगर येथील महानगरपालिकेच्या सर्वे क्रमांक २७ व २८ मधील २०.६ हेक्टर जागेवर १३ मेगावॅट डीसी आणि १० मेगावॅट एसी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.सुमारे ८० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा यंत्रणेसाठी लागणाऱ्या विजेच्या खर्चात २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योजनेला अखेर गती मिळाली
सोलापूर शहरात जल वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. १३५० कोटी रुपयांची ही सुधारित पाणीपुरवठा समितीने मंजूर केली आहे. सोलापूर शहराला दररोज २४ तास पाणीपुरवठा झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती आणि अखेर या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याला समितीने मान्यता दिली आहे. याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे यावेळी आभार मानले. या योजनेला आता गती मिळाली असून टेंडर प्रक्रिया पार पडणार आहे.
Views: 12
Previous Post

अक्कलकोटमध्ये स्वयंभू गणेश व दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दीपोत्सवाचा मंगल सोहळा

Next Post

मंगळवेढ्यात ऊसदराचा तिढा आद्याप कायम साडेचार लाख मे. टन गाळप होऊनही दर अनिश्चित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मंगळवेढ्यात ऊसदराचा तिढा आद्याप कायम साडेचार लाख मे. टन गाळप होऊनही दर अनिश्चित

ताज्या बातम्या

कर्नाटकातील उडुपी येथे २९ नोव्हेंबरला ऐतिहासिक ‘श्री महाधन्वंतरी याग’ : १,००० वर्षे प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र अवशेषांचे दुर्लभ दर्शन

कर्नाटकातील उडुपी येथे २९ नोव्हेंबरला ऐतिहासिक ‘श्री महाधन्वंतरी याग’ : १,००० वर्षे प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र अवशेषांचे दुर्लभ दर्शन

November 26, 2026
जैन गुरुकुलच्या रक्तदान शिबिरात १४५ जणांचे रक्तदान

जैन गुरुकुलच्या रक्तदान शिबिरात १४५ जणांचे रक्तदान

November 26, 2026
जागतिक स्पर्धेत वीटचे  सरपंच करणार भारताचे प्रतिनिधित्व !

जागतिक स्पर्धेत वीटचे  सरपंच करणार भारताचे प्रतिनिधित्व !

November 26, 2026

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची २८ नोव्हेंबर रोजी प्रक्षाळपूजा; दर्शनाच्या वेळेत बदल

November 26, 2026

जि.प. कृषी साहित्य व औजार योजनेच्या अर्जास १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

November 26, 2026
पंढरीत महाद्वारकाला उत्साहात साजरा, कार्तिकी यात्रेची सांगता

पंढरीत महाद्वारकाला उत्साहात साजरा, कार्तिकी यात्रेची सांगता

November 26, 2026
कॉरिडॉर बाधित मंडळींचा कॉरिडॉर विरोधात येथील भूसंपादन ऑफिसवर धडक मोर्चा संपन्न

कॉरिडॉर बाधित मंडळींचा कॉरिडॉर विरोधात येथील भूसंपादन ऑफिसवर धडक मोर्चा संपन्न

November 26, 2026
पोलीस हवालदार अमृत खेडकर यांची दुसऱ्यांदा आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण

पोलीस हवालदार अमृत खेडकर यांची दुसऱ्यांदा आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण

November 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1565402

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!