पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बस्फोटात उडवू आणि भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवू अशी धमकी देण्यात आलीय. पुण्यातील एका व्यक्तीच्या मोबाईलवर परदेशातून हा मॅसेज आला असून एम.ए. मोखीम असे धमकावणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
या मॅसेजमध्ये आरोपी मोखीमने म्हंटलेय की, आपण अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी मोखीम याने मॅसेजमध्ये दिली आहे. दरम्यान, हा मेसेज आल्यानंतर फिर्यादीने पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवादी आढळून येत असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.