देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रापती मुर्मू आगामी 23 ऑगस्ट रोजी गोव्याला भेट देतील. नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रपती 23 तारखेला दुपारी 4 वाजता गोव्याला जातील. याप्रसंगी त्या राज्यातील सर्व आमदारांना संबोधित करतील. मागील वर्षी गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याचवेळी राष्ट्रपती पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू गोव्याला गेल्या होत्या. दरम्यान, यावेळी गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू गोव्यात येत असून, सर्व आमदारांना त्या संबोधित करणार आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















