वाटूर प्रतिनिधी
दिनांक 29 6 2024 रोजी रात्री नऊ 35 वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी हे निवासस्थानी असताना वाटूर येथून सिस्टर मनीषा अहिरे यांनी त्यांना मोबाईल द्वारे कळविले की आपण लवकर या पेशंट आलेला आहे म्हणून त्या स्कुटी वरून घाईगडबडीने निघत असताना रस्त्यात स्कुटी वरून पडल्याने त्यांना मार लागला त्याच परिस्थितीत त्या वाटुर येथे गेल्यानंतर पेशंट रामेश्वर सोपान उबाळे यांना त्यांनी विचारपूस केली की तुम्हाला मार कशाचा लागला आहे
तेव्हा त्यांनी सांगितले की मला अपघातात मार लागलेला आहे म्हणून त्यानी पोलिसांना कळविण्यासाठी एम एल ची बनवत असताना तो म्हणाला की तुम्ही एमएलसी बनवू नका माझी काही एक तक्रार नाही परंतु त्यांनी सांगितले की प्रोसिजर आहे मला एम एल सी पोलिसांना कळवावी लागेल त्यानंतर तो त्यांना म्हणाला की तुम्ही येथे कार्यलयात नसताना मला येथे येऊन खूप वेळ झाला आहे तरी तुम्ही आला नाहीत तुम्ही फुकटची पगार खाता असे म्हणून शिव्या देऊन शिवीगाळ करून त्यांना चापट बुक्याने मारहाण केली
त्यांचे शिपाई दिलीप भाग्यवान, रामू आडे आणि रंजना कंकाळ हे सोडवण्यासाठी आले असता सदरील इसमाने त्यांना पण चापट बुक्याने मारहाण करून सरकारी काम करीत असताना कामात अडथळा निर्माण केला आहे . त्याबाबत वैद्यकीय महिला अधिकारी श्रीमती अंजू विठल वाघमारे/अंभोरे यांचे फिर्यादवरून रामेश्वर सोपानराव उबाळे रा. वाई ता. मंठा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात भा. द .वी.353,323, 504,506 या कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय श्री केंद्रे साहेब करीत आहेत